नाशिक : अभियांत्रिकी तृतीय वर्षाच्या निकालासंदर्भात झालेल्या संभ्रम विद्यापीठाने तत्काळ दूर करावा, निकालातील गोंधळाची दुरुस्ती करून त्यांसंबधीचे स्पष्ट निर्देश महाविद्यालयांना देतानाच पुढील प्रवेशापासून वंचीत राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्याया मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी(दि. १९) ठिय्या आंदोलन केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा निकाल १२ जुलैला क्रेडीट सिस्टीमऐवजी टक्केवारी (परसेंटेज) पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यामुळे अनेक विद्यार्थी या निकालामुळे नापास दाखविले गेल्यामुळे त्यांच्या समोर वर्ष वाया जाण्याची भिती निर्माण झाली. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसह विविध विद्यार्थी संघटनांनी विभागीय कार्यालयात आंदोलन करून विद्यापीठाला निवेदन दिले. निकालात दुरुस्ती करण्याची मागणी केल्यानंतर विद्यापीठाने एक पाऊल मागे घेत क्रे डीट सिस्टीमनुसार निकाल जाहीर करून १६ जुलैपर्यंत यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. व याबबतचे प्रसिद्धपत्रक संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आले होते.परंतु अवघ्या दोन दिवसात हे प्रसिद्धीपत्रक संकेतस्थळावरून हटविण्यात आले. तसेच पुढील प्रवेशप्रक्रियेविषयी महाविद्यालयांनाही कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाही. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयात आंदोलन करून ठ्य्यिा मांडत संबधित निकाल क्रेडीट सिस्टीमनुसार लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, कार्यध्यक्ष आकाश कदम, उपाध्यक्ष अतुल डुंबरे, सरचिटणीस प्रथमेश पवार, चेतन व्यावहारे, ललित मानकर, गौरव सोनार आदि पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.नाशिकसोबतच पुण्यातही आंदोलनअभियांत्रिकी तृतीय वर्षाच्या निकालातील गोंधळ दूर करण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकाचवेळी आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांचा निकाल क्रेडीट पद्धतीने तत्काळ जाहीर करावा तसेच निकालाला झालेल्या उशीरामुळे पहिल्या सत्रातील परीक्षाही पुढे ढकलाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यावर पुणे विद्यापीठातील परीक्षा नियंत्रक अशोक चव्हाण यांनी कुलगुरूंशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांनी अखेर आंदोलन मागे घेतले.