नाशिक : जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लास्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लास्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्र व दफ्तर सांभाळताना धांदल उडताना दिसत आहे. सध्या अकरावी प्रवेशासह विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले कागदपत्र सोबत घेऊन सायबर कॅफेसह मार्गदर्शन केंद्र, सुविधा केंद्र, रिपोर्टींग सेंटर आणि शाळा महाविद्यालयांमध्ये फिरावे लागत आहे. त्याचप्रमाणे प्रवेशासाठी आवश्यक असलेले जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले आदि विविध कागदपत्र जमविण्यासाठी आणि ते प्रवेशप्रक्रीयेत सादर करण्यासाठी पावसात फिरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यासाठी अतिमहत्वाचे असे हे कागदपत्र भिजून खराब होण्याची भिती आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्र अथवा दफ्तरातील वह्या पुस्तकांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापर येत नसल्याने पावसात महत्वाचे कागद आणि वह्या पुस्तके कशी जपावीत असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. शहरात प्लास्टिकबंदीची कडेकोट अंमलबजावणी सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये प्लास्टिकची पिशवी वापरण्याविषयी भिती आहे.त्यामुळे विद्यार्थी जाड फाईल व बॅगमधून कागदपत्र घेऊन जात असले तरी अधून मधून पावसाचा जोर वाढत असल्याने कागदपत्र वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या इमारती,रस्त्यांच्या कडेची वृक्ष, बस स्थानके , चहाच्या टपऱ्या व रस्त्यालगतच्या दुकानांच्या आश्रयाला उभे राहावे लागत असल्याने शैक्षणिक प्रवेशासाठी व शाळा महाविद्यालयांमध्ये जाताना पाण्यापासून धोका असलेले कागदपत्र आणि वह्या पुसके सांभाळायच्या कशा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.
पावसापासून वह्यापुस्तके वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत ; दफ्तर सांभाळताना धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 7:48 PM
जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लास्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लास्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्र व दफ्तर सांभाळताना धांदल उडताना दिसत आहे.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांची कागदपत्र व दफ्तर सांभाळताना धांदल अतिमहत्वाचे कागदपत्र भिजून खराब होण्याची भितीप्रवेशासाठी कागदपत्रांसह बाहेर कसे पडावे? विद्यार्थ्यांसमोर प्रश्न