लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी त्र्यंबकेश्वरजवळील ऐतिहासिक अंजनेरी किल्ल्याची माहिती घेत अभ्यास करत परिसराची साफसफाई केली.प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या अभ्यास दौºयात इतिहास विभागप्रमुख प्रा.नारायण शिंदे, समन्वयक प्रा. डॉ. छाया भोज, प्रा. ज्ञानोबा ढगे यांनी पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अंजनेरी गावाजवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे भारतीय नाणे संशोधन केंद्र १९८४ सालापासून उभारण्यात आलेले आहे. या केंद्रामध्ये दुर्मीळ नाणी, चित्रे, नकाशे, मूर्ती, ऐतिहासिक वस्तू आहेत. भारतातील नाणे संशोधनास उत्तेजन देणारी ही भारतातील पहिली व एकमेव अशी संस्था आहे. भारताचा वैभवशाली इतिहास व संस्कृती याविषयी लोकांमध्ये ज्ञान व जागरूकता वाढविणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.नाण्यांच्या माध्यमातून प्राचीन काळापासूनच इतिहास व त्या अनुषंगाने विविध राजवटींची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. नाणे हे इतिहासाचे अस्सल, प्रथम दर्जाचे व अविनाशी असे साधन आहे. नाण्यांमुळे कालखंड, धातुकाम, राजांची नावे, देवदेवता, धार्मिक स्थिती आदी माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना माहिती देताना प्रा. शिंदे म्हणाले की, काळाच्या ओघात जमिनीवर व जमिनीखाली असंख्य नाणी आजही सुस्थितीत सापडतात. त्याबाबत संशोधन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अंजनेरी हा महत्त्वाचा किल्ला आहे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म येथे झाला अशी आख्ख्यायिका आहे. अंजनेरी मार्गावर गुहा आहे. त्यामध्ये जैन लेणे आहे. मुख्य दालनात पार्श्वनाथांची मूर्ती आहे. त्याच्या बाजूला दोन उभ्या मूर्ती व सन ११४१ असा उल्लेख असलेला संस्कृत शिलालेख आहे. बालेकिल्ल्यावर दोन खोल्यांची सीता गुंफा आहे. त्यामध्ये शिल्पे कोरलेली आहेत. अंजनेरी पठारावर काही दुर्मीळ औषधी वनस्पती आहेत. तसेच जैवविविधता आहे. वन्यपशुप्राणी आहेत. त्यांचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांनी नोंदी घेतल्या.
अंजनेरी किल्ल्यावर अभ्यास दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 11:01 PM
पिंपळगाव बसवंत : येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी त्र्यंबकेश्वरजवळील ऐतिहासिक अंजनेरी किल्ल्याची माहिती घेत अभ्यास करत परिसराची साफसफाई केली.
ठळक मुद्देपरिसराची साफसफाई : दुर्मीळ वनौषधी वनस्पतींची घेतली माहिती