सुरगाणा : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांची कुटूंब कल्याण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री निवड झाल्याने कळवण, सुरगाणा तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे निर्माण भवनात जाऊन डॉ. भारती पवार यांची भेट घेत त्यांचा सन्मान केला. यावेळी सुरगाणा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन डॉ. पवार यांनी दिले. याचवेळी त्यांनी सुरगाणा तालुक्यातील आरोग्याच्या समस्यावरही सविस्तर चर्चा केली.यावेळी डॉ. पवार यांनी आदिवासी भागातील कोविड लसीकरण बाबतीत कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी जनजागृतीकडे लक्ष केंद्रित करून लसीकरण वाढविण्याकरीता सहकार्य करावे असे आवाहन केले. तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली उपजिल्हा रुग्णालयाची मागणी पदाधिकारी यांनी केली असता, लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच पदाधिकाऱ्यांकडून उंबरठाण, बोरगाव येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात यावे. बा-हे, उंबरठाण, पांगारणे, खोकरविहीर, श्रीभुवन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात यावी आदी आशयाचे निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळात भाजपा ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष रमेश थोरात, संघटन सरचिटणीस डॉ. अनिल महाजन, सरचिटणीस एस. के. पगार, कार्यकारिणी सदस्य सचिन सोनवणे, कोषाध्यक्ष रामकृष्ण पगार, दीपक खोत, गोरखनाथ महाले, हिरामण चौधरी आदींचा समावेश होता. निवेदनावर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन महाले, दिनकर पिंगळे, बाळासाहेब सुर्यवंशी, प्रभाकर पवार, सुरेश देशमुख, हेमराज धुम, नारायण महाले, रामदास चौधरी, यमुना वार्डे, सलमान शेख, युवराज चौधरी, हिरामण चौधरी आदींच्या स्वाक्ष-या आहेत.(१४ सुरगाणा १)दिल्ली येथील निर्माण भवनात जाऊन डॉ. भारती पवार यांना निवेदन सादर करतांना रमेश थोरात, डॉ.अनिल महाजन.