लाचखोर उपनिरीक्षक जाधव निलंबित
नाशिक : सरकारवाडा पोलिसांत दाखल गुन्ह्यातील साक्षीदारास आरोपी न करण्यासाठी ५० हजारांची लाच घेणारा आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यास निलंबित करण्यात आले असून, त्याच्या जामीन अर्जावर सोमवारी (दि़ २७) निर्णय होण्याची शक्यता आहे़साक्षीदारास न्यायालयात दाखल करण्यात येणाºया पुरवणी दोषारोपपत्रात आरोपी न करण्यासाठी जाधव याने प्रथम तक्रारदाराकडे दहा लाख रुपयांची लाच मागितली होती़ मात्र, रक्कम देण्यास साक्षीदाराने असमर्थता दर्शविल्यानंतर पन्नास हजार रुपयांची मागणी करण्यात आली़ यामध्ये तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा लावून जाधवला रंगेहाथ पकडण्यात आले. जाधव यास न्यायालयात हजर केल्यानंतर व न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ़ सिंगल यांनी त्यास निलंबित केले आहे़दरम्यान, जाधवच्या वकिलांनी न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावर सोमवारी (दि़ २०) न्यायाधीश एस़ सी़ शर्मा यांनी सरकारी वकील कल्पक निंबाळकर व तपासी अधिकारी हेमंत सोमवंशी यांचे म्हणणे मागितले आहे़ या जामीन अर्जाबाबत २७ नोव्हेंबरला पुढील सुनावणी ठेवल्याने जाधवला आणखी सात दिवस नाशिकरोड कारागृहात राहावे लागणार आहे़