इगतपुरी : मुंबई येथील मध्य रेल्वेच्या दादर रेल्वेस्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने शनिवारी (दि.२२) रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांना घेराव घालून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले, मात्र संबंधित अधिकारी व स्टेशनमास्तर प्रेमचंद आर्या यांनी आंदोलन न करण्याची विनंती केल्याने आंदोलन तूर्त स्थगित करून मुंबई येथील रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांना दि. ना. उघाडे यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.दादर रेल्वेस्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, सेवानिवृत्त रेल्वे कामगारांच्या मुलांना रेल्वेच्या नोकरीत सामावून घेण्यात यावे, इगतपुरी शहरातील ब्रिटिशकालीन रेल्वे दवाखान्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे त्या दवाखान्याची तत्काळ दुरु स्ती करून सर्व पदांसह डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, अशा विविध मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.यावेळी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे, गोरख रोकडे, सोमनाथ आगिवले, काळू गांगड, अनुसया आगिवले, माया जगताप, शेवंता गांगड, सुरेश पवार, संकेत निकाळे आदी उपस्थित होते.रेल्वे महाप्रबंधकांना घेराव घालण्याची कुणकुण पोलीस प्रशासनाला समजताच लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक संजय बर्वे, इगतपुरी शहराचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या वतीने प्रचंड पोलीस बंदोबस्त लावल्याने रेल्वेस्थानकाला पोलीस छावणीचे रूप आले होते.
आदिवासी सेनेचे रेल्वे महाप्रबंधकांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:14 PM
मुंबई येथील मध्य रेल्वेच्या दादर रेल्वेस्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने शनिवारी (दि.२२) रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांना घेराव घालून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले, मात्र संबंधित अधिकारी व स्टेशनमास्तर प्रेमचंद आर्या यांनी आंदोलन न करण्याची विनंती केल्याने आंदोलन तूर्त स्थगित करून मुंबई येथील रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांना दि. ना. उघाडे यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.
ठळक मुद्दे इगतपुरी : अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून धरणे आंदोलन स्थगित