सिन्नर : तालुक्यातील मापारवाडी येथील जमिनीच्या औद्योगिकीकरणासाठी संपादन करण्यापूर्वी या जमिनीचा मोबदला ठरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे आदेश उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले. जमिनीचा मोबदला ठरवण्यासंदर्भात जिल्हाधिका-यांच्या दालनात शेतकऱ्यांसमवेत तातडीने बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
मापारवाडी येथील जमिनी प्रस्तावित औद्योगिकीकरणासाठी संपादित करण्याच्या नोटिसा एमआयडीसीकडून शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, भूसंपादनाची अधिसूचना अद्यापही प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास खुंटला आहे. त्या पार्श्वभूमीवर अदिती तटकरे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे सहसचिव संजय देगावकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपकार्यकारी अधिकारी किरण जाधव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, निफाडच्या उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे आदींसह अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
------------------------
२०४ हेक्टर जमीन संपादित होणार
औद्योगिकीकरणासाठी मापारवाडी येथील २०४ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. एमआयडीसीने त्यासंदर्भात शेतकऱ्यांना नोटिसाही बजावल्या आहेत. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. एक तर या जमिनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन ताब्यात घ्याव्यात किंवा शेतक-यांच्या सातबारावरील एमआयडीसीचे शिक्के काढून टाकावेत, अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी या बैठकीत केली.
---------------------
भूसंपादन करा किंवा सातबारा कोरा करा
मापारवाडीबरोबरच तालुक्यातील इतर गावांतील सुमारे पाच हजार हेक्टरवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आरक्षण टाकले आहे. शासन या जमिनी ताब्यात घेत नाही आणि शेतक-यांच्या सातबारावरील शिक्केही पुसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती खुंटली आहे. एकतर, शासनाने योग्य मोबदला देऊन या जमिनींचे संपादन करावे किंवा त्यावरील एमआयडीसीचे शिक्के काढून टाकावेत, अशी मागणी कोकाटे यांनी केली.
---------------
सिन्नर तालुक्यातील मापारवाडी येथील जमीन संपादनासंदर्भात चर्चा करताना उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे. समवेत आमदार माणिकराव कोकाटे, किरण जाधव, संजय काटकर, नितीन गवळी, अर्चना पठारे यांच्यासह एमआयडीसीचे अधिकारी. (२३ सिन्नर २)
===Photopath===
230121\23nsk_3_23012021_13.jpg
===Caption===
२३ सिन्नर २