लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : धुळे जिल्ह्यातील सोनगीर परिसरात इंदोरच्या सुवर्ण व्यवासायिकांच्या कामगारांची लुटमार करून पोबारा करणाऱ्या तीन आरोपींना दरोड्यातील मुद्देमालाससह अटक करण्यात यश आले आहे. अंबड पोलिसांनी अवघ्या चार तासात गुन्ह्याचा छडा लावत एकूण २५ लाख ८० हजार १७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल यांनी दिली. यावेळी उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, परिमंडळ २चे सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर आदि उपस्थित होते. पोलीस आयुक्तालयात बुधवारी (दि.१७)पत्रकार परीषदेच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांनी घडलेल्या गुन्हयाविषयी व कारवाईची माहिती दिली. या गुन्ह्यात अंबड परिसरातील गणेश नानाजी भामरे(२५)रा.यमुनानगर, कामटवाडा सिडको, शुभम सुरेश बागुल(२३),रा.लक्ष्मीनगर अंबड व नझीम सत्तार शेख (२३)रा. त्रीमुर्ती चौक सिडको या तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ लाख ४७ हजार ३२० रुपयांच्या रोकडीसह दरोड्यासाठी वापरण्यात आलेली १ तवेरा गाडी, ४ मोबाईल फोन, मिरची पूड, लाकडी दांडा, दोरी चाकू, वेगवेगळ््या नंबरचे स्टीकर असा एकूण २५ लाख ८० हजार १७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरोड्यातील आरोपींना चार तासात पकडण्यात यश
By admin | Published: May 17, 2017 2:12 PM