सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या बीबीए कोर्सच्या २०२० च्या परीक्षेतील गुणवत्ता यादीतील पहिले पाचही विद्यार्थी अशोका सेंटर फॉर बिझनेस अँड कॉम्प्युटर स्टडिज (एसीबीसीएस) या महाविद्यालयातील आहेत. विद्यापाठांतर्गत बीबीए शाखेत असे प्रथमच घडलेले आहे. विद्यापीठातर्फे जाहीर होणाऱ्या पहिल्या १० विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता क्रमवारीत अशोकाचे सात विद्यार्थी आहेत. त्यात मुजेन कोकणी ही विद्यापीठात अव्वल स्थानावर आहे, तर तेजल धिमन द्वितीय व नित्यप्रिया कलियथ तृतीय स्थानावर आहे.
गुणवत्ताधारकांची यादी :
मुजैन कोकणी (८७.३८ टक्के), तेजल धिमन (८७.२१ टक्के), नित्यप्रिया कलियथ (८६.७५), भूमी आनंद (८६.३३), वैभवी घोडके (८६.२९), आयुषी शर्मा (८४.८३), करुणा पाटील (८४.४६) या विद्यार्थ्यांचे संस्था आणि महाविद्यालयाकडून कौतुक करण्यात आले. तसेच पहिली आलेल्या विद्यार्थिनीस एक लाख रुपये व चार विद्यार्थिनींना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी घोषित केले.
याप्रसंगी सचिव श्रीकांत शुक्ला, संचालक (उच्चशिक्षण) डॉ. डी.एम. गुजराथी, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, प्राचार्या डॉ. हर्षा पाटील, बी.बी.ए. शाखा उपप्राचार्य लोकेश सुराणा, बी.बी.ए-सी.ए. उपप्राचार्या प्रतिमा भालेकर उपस्थित होते.