नाशिक : चिपळूणनजीक डेरवणाला झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत भोसला स्विमिंग क्लबच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय यश मिळवत २३ पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत विविध वयोगटात झालेल्या स्पर्धेत १३ सुवर्ण , ६ रौप्य, ४ कांस्य अशा एकूण २३ पदकांची कामे या क्लबच्या खेळाडूंनी केली. या सर्व खेळाडूंचे तसेच मॉडर्न पेंटॅथलॉनच्या राष्ट्रीय लेझर रन स्पर्धेत १२ वर्ष वयोगटात दुसरी आलेली राधिका महाले, १५ वर्ष वयोगटात तिसरा आलेला जय व्यवहारे, यांचे भोसलाचे समादेशक ब्रिगेडियर एम.एम. मसूर,चीफ ट्रेनिंग ऑफिसर एस.एम. मिश्रा, संस्थेचे सहकार्याध्यक्ष डॉ.दिलीप बेळगावकर,कार्यवाह हेमंत देशपांडे, प्रशांत नाईक यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक शंकर मादगुंडी, घनश्याम कुंवर, विलास देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
या जलतरणपटूंमध्ये ओंकार ढेरींगेने ५ सुवर्ण, अबीर धोंड आणि वैष्णवी आहेर यांनी प्रत्येकी ४ सुवर्ण आणि १रौप्य पदके पटकावून विशेष उल्लेखनीय कमाई केली. त्याशिवाय ओवी सहाणे, आश्लेषा आहेर, श्रावणी गडाख, सोहम कुलकर्णी यांनीदेखील घवघवीत यश मिळवून पदकांची कमाई केली.
------------------------------------
फोटो (भोसला स्विमिंग फोटो )
पदकविजेत्या खेळाडूंसमवेत प्रशिक्षक विलास देशमुख, घनश्याम कुंवर , समादेशक ब्रिगेडियर एम.एम. मसूर, प्रशिक्षक शंकर मादगुंडी, चीफ ट्रेनिंग ऑफिसर एस.एम. मिश्रा आदी.