शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

‘कॅट्स’च्या तळावरून अखेर बिबट्या जेरबंद करण्यास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 1:41 PM

कॅट्सच्या आवारात असलेला जंगलाचा परिसर आणि निर्मनुष्य भाग यामुळे या भागात बिबट्यासारख्या वन्यजीवांचा वावर असल्याच्या तक्रारी

ठळक मुद्देप्रौढ नर बिबट्या जेरबंद पिंज-याचा दरवाजा खाली पडल्याची माहिती देण्यात आली काही दिवसांपुर्वी त्यांनी पिंज-याची जागा बदलली

नाशिक : गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट्स)च्या हेलिकॉप्टर उड्डाणाच्या धावपट्टीपासून अगदी दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या गवताळ भागात लावलेल्या वनविभागाकडून पंधरवड्यापुर्वी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि.२९) सकाळी प्रौढ नर बिबट्या जेरबंद झाला.कॅट्सच्या आवारात असलेला जंगलाचा परिसर आणि निर्मनुष्य भाग यामुळे या भागात बिबट्यासारख्यावन्यजीवांचा वावर असल्याच्या तक्रारी वारंवार संबंधित लष्करी अधिकाऱ्यांकडून नाशिक पश्चिम वनविभागाकडे पत्रांद्वारे केल्या जातात. असेच एक पत्र सोमवारी (दि.१०) वनविभागाला कॅट्सकडून प्राप्त झाले होते. या पत्राची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, उत्तम पाटील आदींनी कॅट्सच्या परिसरात भेट देत पाहणी करून बिबट असल्याची खात्री पटविली. यानंतर बुधवारी (दि.१२) वनकर्मचा-यांनी या भागात पिंजरा तैनात केला.दरम्यान, दररोज वनकर्मचा-यांकडून या पिंज-याबाबतची माहिती कॅट्समधील कर्मचा-यांकडून जाणून घेतली जात होती. तसेच दोन ते तीन दिवसानंतर वनरक्षक पाटील हे पिंजरा लावलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करत होते. पिंज-यात बिबट्या जेरबंद होत नव्हता. त्यामुळे त्यांनी या भागात पाहणी करून बिबट्याच्या संचाराच्या पाऊलखुणांद्वारे माग काढला आणि काही दिवसांपुर्वी त्यांनी पिंज-याची जागा बदलली. कॅट्सच्या पोस्ट क्रमांक-१ आणि हेलिकॉप्टरच्या हॅँगर या दोघांमधील मोकळ्या भागातील गवताने वेढलेल्या परिसरात पिंजरा लावण्यात आला. या पिंज-यात बुधवारी मध्यरात्री बिबट्या अडकला. सकाळी सात वाजेच्या सुमारास कॅट्समधून वनकर्मचा-यांना बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंज-याचा दरवाजा खाली पडल्याची माहिती देण्यात आली. तत्काळ वनधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठत खात्री केली असता बिबट्या पिंज-यात जेरबंद झालेला होता. तत्काळ वन्यप्राणी रेस्क्यू वाहनाद्वार बिबट्याला पिंज-यातून वनविभागाने कॅट्समधून गंगापूर धरणालगतच्या वनविभागाच्या रोपवाटिकेत हलविले.

टॅग्स :leopardबिबट्याwildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग