नाशिक : शहरातील नेहमी वर्दळीचे पर्यटनस्थळ असलेल्या पांडवलेणीवर जखमी अवस्थेत अडकलेल्या एका व्यक्तीची बीट मार्शल आणि वैनतेय गिर्यारोहक संस्थेच्या सदस्यांनी एकत्रित प्रयत्न करून सुररुप सुटका केली आहे.नाशिकमधील ऐतिहासिक वारसा असेलेल्या पांडवलेणीपर्यंत जाण्यास पर्यटकांना परवानगी आहे. मात्र लेणी ओलांडून राखीव वनक्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करून डोंगरसर करण्यास वन संरक्षण कायद्यानुसा निर्बंध असून अशा प्रकारे राखीव वनक्षेत्रात प्रवेश करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. असे असतानाही काही अतिउत्साही मंडळींकडून डोंगर सर करण्याच्या प्रयत्नात याठिकाणी दुर्घटनांचे प्रमाण वाढतच आहेत. त्यामुळे पोलिसांसोबतच गिर्यारोहकांना अशा उतिउत्साही मंडशळींना वाचविण्याचा व्याप वाढला आहे.
पांडवलेणी येथील निसर्गरम्य ठिकाणी पावसामुळे चौहूबाजूने हिरवळ पसरल्याने पर्यटकांना येथील पर्यटनस्थळाची भुरळ पडत असून शुक्रवारी (दि.२३) सकाळी सात वाजेच्या सुमारास सिडकोतील उत्तमनगर येथील बाळासाहेब सुरसे (५२)पांडवलेणीचा डोंगर सर केला. परंतु उतरण्याच्या वेळी ते सुमारे पंचवीस ते तीस फुट पाय घसरून पडले त्यावेळी डोंगराच्या टोकावर कोणीही नसल्याने त्यांना तेथेच अडकून राहावे लागले होते. परंतु दहा वाजण्याच्या सुमारास एक पर्यटक सुरसे घसरेल्या बाजूनेच जात असताना त्याला जखमी अवस्थेत ते आढळून आल्याने त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल राजेंद्र राजपूत, राजेश निकम व वैनेतय गिर्यारोहक संस्थेचे चेतन खर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डोंगरावर जाऊन जखमी अवस्थेत अडकेल्लाय बाळासाहेब सुरसे यांची सुटका करीत त्यांना कपड्याची झोळी करून जखमी अवस्थेत डोंगरावरून खाली आणले. दरम्यान, या घटेत सुरसे ना हातापायास मार लागला असून शरीराला अनेक ठिकाणी घसरल्याने जखमा झाल्या आहेत. त्यांचा डावा पायही फॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत असून त्यांना औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.