नाशिक : सिडको परिसरातील कर्मयोगीनगरमधील रणभूमी क्रीकेट ग्राऊंडजवळ सुरू असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनच्या नाल्यात पडून मातीच्या ढिगाऱ्या खाली अडकलेल्या कामगारास वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना गुरुवारी (दि.५) यश आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने तब्बल अर्धातास चाललेल्या बचाव मोहीमेनंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर दिली आहे. कर्मयोगीन नगरमधील रणभूमी क्र ीकेट ग्राऊंडजवळ महानगर पालिकेच्या भूयारी गटार योजनेचे काम सुरू असून या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने सुमारे १० ते १५ फूट खोल नाला खोदण्याचे काम सुरू आहे. या नाल्यात काही कामासाठी उतरलेला कामगार विकास टापरे (५०)हा अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने माती खाली दाबला गेल्याने खळबळ उडाली. ही घटना समजताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या मदतीने माती काढण्यास सुरुवात केली, त्याप्रमामे पोलीस नियंत्रण कक्षालाही घटनेची माहिती दिली. पोलीस नियंत्रण कक्षाने तत्काळ ही घटना अग्नीशमन दलाच्या सातपूर विभागीय कार्यालयास कळविली. सुमारे२ वाजून १८ मिनिटांनी घटनेची माहिती कळताच अग्नीशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहचून मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या विकास टापरे यास जेसीबी आणि स्थानिकांच्या मदतीने ५ ते सहा मिनिटांमध्येच बाहेर काढले. परंतु, माती कोसळल्यापासून ते ढिगाºयाखालून बाहेर काढण्यापर्यंत तब्बल अर्धातास मातीच्या ढिगाºयाखाली असल्याने विकास टापरे बेशुद्ध झाला होता. अग्नीशमन दलाच्या जवानांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचापासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती स्थीर आहे.
अग्नीशमन बंबातून रुग्णाला हलविले रुग्णालयात रणभूमी क्रीकेट मैनाजवळ घडलेल्या अपघात मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्याला वाचविण्याच अग्नीशमन दलाला यश आले. मात्र त्याला रुग्णलायता दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेला संपर्कसाधूनही रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकली नाही. त्यामुळे अखेर अग्नीशमन दलाचे लिडींग फायरमन दिलीप दोंदे, वाहन चालक संजय तुपलोंढे, फायरमन अशोक मोरे, ताराचंद सूर्यवंशी व रमाकांत खारे यांनी मातीच्या ढिगाऱ्या खाली अडकून श्वास गुदमरलेल्या विकास टापरे यास प्रथमोपचार करून अग्नीशमन दलाच्या बंबातूनच जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.