ब्राह्मणगाव : बागलाण तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात ब्राम्हणगांव येथील मविप्र समाज नाशिक संचालित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल, अभिनव बाल विकास मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाला आधुनिक सुरक्षित गाडी या उपकरणाला द्वितीय क्र मांक मिळाला.सटाणा येथील डिव्हाईन इंग्लिश मेडियम स्कूल सटाणा येथे दोन दिवसीय ४५ वे बागलाण तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. यात ब्राम्हणगांव विद्यालयाने द्वितीय विभागात दाबाचा वापर करून जे. सी. बी. हे उपकरण किरण अहिरे व युवराज अहिरे यांनी सादर केले होते. प्राथमिक विभागात आधुनिक सुरक्षित गाडी हे उपकरण पल्लवी डांगळ व प्रियंका बिरारी या विद्यार्थिनींनी सादर केले.या उपकरणाला प्राथमिक गटात द्वितीय क्र मांक मिळाला. विज्ञान शिक्षक सचिन शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य आर. डी. पवार यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे कौतूक केले.कार्यक्र माचे सुत्रसंचलन जे. एच. पाकळे यांनी केले.यावेळी जेष्ठ शिक्षक पी. व्ही. चव्हाण, पी. आर. गांगुर्डे, के. एम. शिरसाठ, यु. एन. खरे, ई. टी. पवार, के. एन. शेवाळे, एस.ए म. अहिरे, एन. बी. पाटील, एल. सी. शिरसाठ, डी. बी. सावकार, डगळे, निकम, देवरे भाऊसाहेब, निकम, सैय्यद, मुठेकर, पाटील, गांगुर्डे आदी उपस्थित होते.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्रीराम अहिरे विद्यालयाचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 6:16 PM
ब्राह्मणगाव : बागलाण तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात ब्राम्हणगांव येथील मविप्र समाज नाशिक संचालित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल, अभिनव बाल विकास मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाला आधुनिक सुरक्षित गाडी या उपकरणाला द्वितीय क्र मांक मिळाला.
ठळक मुद्देदोन दिवसीय ४५ वे बागलाण तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न