दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथील गोपालकृष्ण देवस्थान जमिनीच्या अवैध विक्रीविरोधात पुकारलेल्या आमरण उपोषणकर्त्यासोबत तहसीलदार पंकज पवार यांनी मध्यस्थी करत भोगवटादार वर्ग १ ऐवजी भोगवटादार वर्ग २ चा दर्जा देत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणकर्ते अशोक जाधव, लक्ष्मण देशमुख, किशोर देशमुख, शंकर ठाकूर, बाळासाहेब कळमकर, योगेश भार्गवे यांना लिंबूपाणी देत उपोषणाची सांगता केली. मोहाडी येथे गोपालकृष्ण या पुरातन मंदिर देवस्थानास इंग्रज शासनाच्या वतीने इनाम वर्ग ३ ची जमीन सन १८६४ मध्ये गट नं. ४६१ जमीन २३ हेक्टर (११५ बिघे) देण्यात आली होती. मागण्या मान्य झाल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील, किरण नाईक, पुंडलिक कळमकर, सुदामराव पाटील, रामराव पाटील, सुधाकर सोमवंशी, गणेश पाटील, मनोज निकम, सुदाम भोये, शरद घोलप, भगवान जोशी, अनिल गोवर्धने, केदारनाथ क्षीरसागर, नंदकुमार डिगोरे, नंदू नेवकर, भाऊसाहेब पवार, एकनाथ भगरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गोपालकृष्ण देवस्थान जमिनीसंदर्भात ग्रामस्थांच्या लढ्याला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:15 AM