येवला : सध्याच्या स्पर्धात्मक युगात ताणतणाव प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग असला तरी त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास यश मिळू शकते. त्यासाठी विविध छंद जोपासून आणि आनंद मिळेल असे चांगले काम करून स्वत:मध्ये सकारात्मक ऊर्जा तयार करा. सकारात्मक व नकारात्मक भावनांचा योग्य ताळमेळ घातला जाणे आवश्यक असून, योग्य व्यवस्थापन केल्यास तणावाचे प्रमाण कमी होऊन सुखी व आनंदी जीवन जगता येईल, असे प्रतिपादन सेवानिवृत्त स्कॉडन लीडर (वायुसेना) व उडान फाउण्डेशनच्या संचालक सुप्रिया चित्रे यांनी केले.आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या बहि:शाल शिक्षण मंडळ योजनेंतर्गत बाभूळगाव येथील मातोश्री आसराबाई दराडे आयुर्वेद महाविद्यालय येथे ताणतणाव या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी चित्रे बोलत होत्या. उपप्राचार्य डॉ. मिनेश चव्हाण कार्यक्र माचे अध्यक्ष होते. तर डॉ. रवींद्र शिवदे व्यासपीठावर उपस्थित होते. वक्त्यांचा परिचय विद्यार्थी कल्याण समन्वयक डॉ. सागर इताल यांनी केला. प्रास्ताविक लक्ष्मण खंडागळे यांनी केले. डॉ. वैभव भडांगे यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. संपत भताणे यांनी मार्गदर्शन केले.चित्रे यांनी तणाव व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तणाव निर्माण होण्याची कारणे, प्रकार, तणावमुक्ती याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. अभ्यासाचा तणाव घेण्याचे कारण नसून वेळेचे नियोजन आणि हसतखेळत सामोरे गेल्यास सहजपणे अभ्यास होऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.
योग्य व्यवस्थापन केल्यास हमखास यशप्राप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 10:41 PM
सध्याच्या स्पर्धात्मक युगात ताणतणाव प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग असला तरी त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास यश मिळू शकते. त्यासाठी विविध छंद जोपासून आणि आनंद मिळेल असे चांगले काम करून स्वत:मध्ये सकारात्मक ऊर्जा तयार करा. सकारात्मक व नकारात्मक भावनांचा योग्य ताळमेळ घातला जाणे आवश्यक असून, योग्य व्यवस्थापन केल्यास तणावाचे प्रमाण कमी होऊन सुखी व आनंदी जीवन जगता येईल, असे प्रतिपादन सेवानिवृत्त स्कॉडन लीडर (वायुसेना) व उडान फाउण्डेशनच्या संचालक सुप्रिया चित्रे यांनी केले.
ठळक मुद्देसुप्रिया चित्रे : ताणतणाव विषयावर परिसंवाद