नाशिक - गंगापूर रोडवरील व्हेज ऍरोमाच्या आवारात सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने धांदल उडाली. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत आग विझल्याने अनर्थ टळला. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.व्हेज ऍरोमा हॉटेलजवळील परिसरात बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीत वेल्डिंगचे काम सुरु आहे. गुरुवारी (दि.28) सकाळी वेल्डिंगचे काम सुरु असताना त्यातील काही ठिणग्या व्हेज ऍरोमा हॉटेलच्या परिसरात पडल्या. तेथ्लृे प्लास्टिकच्या खुर्ची-टेबल तसेच प्लास्टिकचे कागद ठेवलेले होते. ठिणग्यांमुळे प्लास्टिकने अचानक पेट घेतला. धुळीचे लोट निघाल्यानंतर आग लागल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे याची माहिती तातडीने अग्निशमन दलास कळवण्यात आली. त्यानुसार दलाने तातडीने घटनास्थ्लृळी धाव घेत एका बंबाच्या सहायाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत 5 ते 10 हजार रुपयांचे नुकसान झाले. सब ऑफिसर सी. एम. भोळे, लिडींग फायरमन डि. व्ही. दोंदे, फायरमन पी. एस. सुर्यवंशी, व्ही. एम. निर्वाण, ए. पी. मोरे, चालक एस. एस. तुपलोंढे यांच्या पथ्लृकाने ही कारवाई केली.