नाशिक : जिल्'ात अवकाळी पावसाचे व गारपिटीचे थैमान सुरूच असून, गुरुवारी (दि.११) जिल्'ात सात तालुक्यांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी कृषी विभागाला दिला आहेत. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जिल्'ात काही तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, कांदा, डाळींब, गहू, हरबरा पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने प्राथमिक नुकसान झालेल्या गावांची नावे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे- कंसात झालेल्या पिकांचे नुकसान- बागलाण- ब्राह्मणगाव, लखमापूर, यशवंतनगर,धांद्री, (कांदा, द्राक्ष, डाळींब), चांदवड- मंगरूळ, सोग्रस, चिंचोले, भरवीर, साळसाने (कांदा व द्राक्ष) निफाड-रूई, सारोळेथडी, धारणगाव वीर, खेडलेझुंगे, नांदूरमधमेश्वर,महादेवनगर, विंचूर, देवगाव, मानूर (द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा) सुमारे एक हजार हेक्टर, मालेगाव- रावळगाव, तळवाडे, दुधे, सातमाने, वडनेर (खा), मोडदर, निमशेवडी, वडेल, अजंग, खायदे (डाळींब, गहू व हरभरा), येवला- मानुरी, मुखेड, देवगाव, एरंडगाव (द्राक्ष, कांदा), देवळा-वासूळपाडा, महालपाटणे, निंबोळा, वाखारी, डोंगरगाव, पिंपळगाव, उमराणे (कांदा, डाळींब) सिन्नर- मुसळगाव, खोपडी, कुंदेवाडी (कांदा, हरभरा, गहू), नांदगाव-जळगाव(बु.) चिंचविहीर (कांदा, हरभरा, गहू) आदि गावांमध्ये सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
अवकाळी गारपिटीने दहा हजार हेक्टर पिकांचे नुकसान कृषी विभागाचा अंदाज,
By admin | Published: December 13, 2014 1:53 AM