नाशिक : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना भेटी देऊन केलेल्या पाहणीनंतर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आरोग्य सभापती सुनंदा दराडे यांनी अचानक आरोग्य विभागाला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत पाहणी केली. दराडे यांच्या भेटीमुळे उपस्थित कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली, तर अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे काम दोन ठिकाणी विभागण्यात आले असून, काही कर्मचारी जिल्हा शासकीय रुग्णालयात बसतात तर काही जिल्हा परिषदेत बसतात, मात्र अनेक कर्मचारी व अधिकारी जागेवर नसतात अशी तक्रार या कार्यालयात शासकीय काम घेऊन येणाºया अभ्यागतांकडून केली जाते. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सभापती सुनंदा दराडे यांनी आरोग्य विभागाच्या कार्यालयाला भेट देण्याचा निर्णय घेतला व त्याबाबतची गोपनियता पाळत त्यांनी आरोग्य विभागाला भेट देऊन प्रत्येक टेबलावर जाऊन येथील कर्मचारी, कोण आहे व कुठे गेले अशी विचारणा केली. यावेळी दराडे यांनी आरोग्य अधिकारी कोठे आहेत, अशी विचारणा केली. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये असल्याचे सांगण्यात आले़कर्मचाºयांची भंबेरीसभापती अचानक आल्याचे कळताच उपस्थित कर्मचाºयांची भंबेरी उडाली. दराडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या दालनात ठाण मांडून कर्मचारी, अधिकाºयांचे हजेरी पुस्तक मागविले व त्यानुसार प्रत्येक कर्मचाºयांची हजेरी घेतली. त्यातील काही कर्मचारी रजेवर असल्याचे तर काहींच्या स्वाक्षरी असतानाही ते जागेवर नसल्याचे आढळून आले.
सभापतींची आरोग्य विभागाला अचानक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 1:08 AM