देसराणे : कळवण तालुक्यासह पुनद खोऱ्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अत्यल्प प्रमाणात पडलेला पाऊस आणि त्याच बरोबर दुष्काळाची दाहकता यामुळे ह्यावर्षी प्रचंड प्रमाणात असे जाणकारांचे मत खरे ठरत असून मार्च महिना अर्धा सरला असतांना आता सूर्य देवतेने आग ओकण्यास सुरु वात केली आहे.वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने उन्हाळा कडक राहील असे जाणवु लागले आहे. उन्हाची तीव्रता वाढताच नागरिक मनाला आणि शरीराला गारवा मिळावा यासाठी धरपड करु लागले आहेत.उन्हाची तीव्रता वाढल्याने घरात पिण्यासाठी थंड पाणी हवे असते. शेतकरी, मजूर, कारागिर अशी गरीब कुटुंबात थंड पाण्यासाठी मातीचे माठ, रांजण घेण्यासाठी नागरिकांचा कल वाडू लागली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन पुनद खोºयातील अनेक ठिकाणी गरीबांचे फ्रिज माठ उपलब्ध झाले आहेत.परिसरात उन्हाचा तडाखा वाढू लागला असून शितपेयांची दुकाने सजु लागली आहेत. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून यासाठी नागरिक घराबाहेर पडतांना टोप्या- उपरणे परिधान करीत आहेत. वातावरणातील बदलामुळे सर्दी पडशासह साथीचे आजार डोके वर काढत आहेत.निसर्गाच्या लहरीपणामुळे व उन्हाच्या तीव्रतेमुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने शेतीसिंचन व चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पुनद खोऱ्यात उन्हाचा तडाखा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 6:02 PM
देसराणे : कळवण तालुक्यासह पुनद खोऱ्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अत्यल्प प्रमाणात पडलेला पाऊस आणि त्याच बरोबर दुष्काळाची दाहकता यामुळे ह्यावर्षी प्रचंड प्रमाणात असे जाणकारांचे मत खरे ठरत असून मार्च महिना अर्धा सरला असतांना आता सूर्य देवतेने आग ओकण्यास सुरु वात केली आहे.
ठळक मुद्देकळवण : मातीचे माठ, रांजण खरेदीसाठी नागरिकांची गर्दी