सीआयआय महाराष्ट्राची सर्वसाधारण घेण्यात आली. यात विद्यमान उपाध्यक्ष सुधीर मुतालिक यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी औरंगाबादचे श्रीराम नारायणन यांची निवड करण्यात आली. मुतालिक यांनी यापूर्वी सीआयआय नाशिकचे अध्यक्षपद भूषविले आहे.तसेच विविध संस्थांवर ते कार्यरत आहेत. मावळते अध्यक्ष तथा टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद गोयल यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे मुतालिक यांनी स्वीकारली. आगामी काळात उद्योगांशी संबंधित धोरणांच्या बाबतीत सरकारशी चर्चा करणे, उद्योगांना स्पर्धात्मक बनण्यासाठी लक्ष केंद्रित करणे, विशेषत: व्यवसायातील उत्कृष्टतेसाठी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांवर लक्ष केंद्रित करणे, उद्योजकांच्या विकासासाठी विशेष क्लस्टर तयार करणे व डिजिटलायझेशन आणि इंडस्ट्री ४.० च्या दिशेने विशेष अंमलबजावणी करणे, कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे यावर भर दिला जाणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष सुधीर मुतालिक यांनी लोकमतशी बोलताना दिली.
१८९५ मध्ये स्थापन झालेल्या सीआयआय ही संस्था उद्योग आणि सरकार भागीदार म्हणून अनुकूल वातावरण तयार करून ते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सीआयआय ही एक अशासकीय उद्योग विकास व व्यवस्थापनात एक अग्रगण्य संस्था आहे.
===Photopath===
040321\04nsk_35_04032021_13.jpg
===Caption===
सुधीर मुतालीक