दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना संचालक मंडळाच्या धोरणानुसार सवलतीच्या दरात साखर वाटप सुरू केल्याचे कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले.कारखानकादवा सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटपा स्थळावर सभासदांना सन २०१८-१९ करिता सवलतीच्या दराने साखर वाटप सुरू केले आहे. साखर विक्र ीचा दर २३ रुपये असून, ज्या सभासदांची शेअर्स रक्कम १०,००० रुपये पूर्ण आहे, त्यांना ५० किलो साखर मिळणार आहे.ज्या सभासदांची शेअर्स रक्कम अपूर्ण आहे व इतर कारखाना थकबाकी आहे, अशा सभासदांनी उर्वरित रक्कम भरून कारखान्यास सहकार्य करावे व ५० किलो साखर घेऊन जावी, याप्रमाणे धोरण ठरलेले आहे.सर्व सभासदांनी शेतकी गट, कार्यालयात जाऊन स्लिपबॉय, फिल्डमन यांच्याकडून आपापले साखर कार्ड घेऊन जावे, असे आवाहन शेटे यांनी केले आहे.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, सर्व संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित होते.
कादवा सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 1:33 AM
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना संचालक मंडळाच्या धोरणानुसार सवलतीच्या दरात साखर वाटप सुरू केल्याचे कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले.
ठळक मुद्दे५० किलो साखर मिळणार आहे.