लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी १ जूनपासून पुकारलेल्या संपादरम्यान शहरी भागात भाजीपाला, दूधपुरवठा, बाजार समित्यांमध्ये लिलाव होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने शहरातील बाजारपेठेत संपाच्या दुसऱ्या दिवशी शुकशुकाट दिसून आला. संपाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही शहराची नाके बंदी करीत शहरात येणारा भाजीपाला, दूध व अन्नधान्याचा पुरवठा खंडित केला. शेतकऱ्यांनी गाव, तालुका पातळीवर नाकाबंदी केली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्व भाजीबाजारांमध्ये शुकशुकाट पहायला मिळाला. रविवार कांरजा, भद्रकाली, गोदावरी पटांगणावर तसेच उपनगरांमध्ये काही किरकोळ भाजीविक्रेत्यांनी त्यांची दुकाने लावली. मात्र त्यांच्याकडेही दोन दिवसापूर्वीचाच भाजीपाला होता. त्यातही बहुतांश विक्रेते कांदे, बटाटे आणि हिरवी मिरची घेऊनच दुकान लावून बसले होते. विक्रेत्यांकडे एकतर सुरकटलेला भाजीपाला अथवा भाजीपालाच नसल्याने त्यांच्याकडे ग्राहकच फिरकत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. दोन दिवसापूर्वी संपाच्या पूर्वसंध्येला नाशिककरांनी किमान तीन, चार दिवस पुरेल एवढा भाजीपाला खेरदी करून ठेवला असल्याने भाजीबाजारात ग्राहकांची संख्या कमी असल्याच्या प्रतिक्रिया विक्रेत्यांनी व्यक्त केल्या. दोन दिवसापूर्वी संप होणार म्हणून विक्रेत्यांनी २० ते ३० टक्क चढ्या दराने भाज्याची विक्री केली. काहींनी तर दुप्पट किमतीने भाजीपाला विकला. मात्र शुक्रवारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसलेल्या विक्रे त्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली.
भाजीबाजारात शुकशुकाट
By admin | Published: June 03, 2017 1:13 AM