पिंपळगाव बसवंत : स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि., (रानवड) काकासाहेब नगर या साखर कारखान्यात चालू हंगामासाठी ऊस नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्याची नोंद घेऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निफाड तालुक्यातील रानवड साखर कारखान्यात येत्या चालू हंगामात ऊस गाळप करणार असून त्याची नोंदणी सुरू १ ऑगस्ट रोजीपासून करण्यात येणार असल्याची माहिती संचालक मंडळाने दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बनकर नागरी सहकारी पतसंस्था संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि., (रानवड) काकासाहेब नगर या साखर कारखाना परिसरात विविध विकासकामे सुरू असून, कारखान्याचे दुरुस्तीचे कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे.
-----------------------------
ऊस गाळप करणार
येणाऱ्या चालू हंगामात कारखाना ऊस गाळप करणार असून, त्यासाठी होणारी ऊसनोंदणी दि. १ ऑगस्टपासून कारखाना कार्यस्थळावरील शेतकी विभागाच्या कार्यालयात होणार आहे. ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस नोंदणी करायची असेल त्या शेतकऱ्यांनी ऊस नोंद असलेला सात-बारा उतारा सोबत घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन यानिमित्ताने स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ माळोदे यांनी व संचालक मंडळाने केले आहे. (३१ रानवड)
310721\31nsk_17_31072021_13.jpg
३१ रानवड