शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

सुहास कांदे यांच्याकडून पंकज भुजबळ यांचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:46 AM

राष्टवादी कॉँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी १३,८७२ मतांनी विजय मिळविला.

नांदगाव : राष्टवादी कॉँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी १३,८७२ मतांनी विजय मिळविला. त्यांच्या विजयाच्या रूपाने तब्बल दहा वर्षांनंतर या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला.ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा झेंडा आहे. कांदे यांना मिळालेल्या मताधिक्यात मोठा भाग नांदगाव व मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटांचा आहे. मात्र नांदगाव नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता असून, ही याठिकाणी पंकज भुजबळ यांना कांदे यांच्यापेक्षा काही हजारांचे मताधिक्य मिळाले. तसेच मनमाड नगर परिषदेतसुद्धा सेनेची सत्ता आहे; मात्र तेथे कांदेंना अपेक्षित मते मिळाली नाहीत. गुरुवारी सकाळी येथील प्रशासकीय कार्यालय आवारात मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच कांदे यांनी आघाडी घेतली होती. साधारणत: बाराव्या फेरीपर्यंत त्यांची आघाडी टिकून होती.त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये मात्र पंकज भुजबळ यांनी आघाडी घेतली. त्यामुळे निकालाची क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत सामना अटीतटीचा होत होता. १७व्या फेरीनंतर मात्र कांदे यांनी पुन्हा मतमोजणीत आघाडी घेतली. त्यानंतर ती अखेरपर्यंत टिकवून ठेवली. अखेरच्या फेरीनंतर कांदे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली होती.विजयाची तीन कारणे...1गेली दहा वर्षे सातत्याने मतदारांच्या संपर्कात राहिले. ग्रामपंचायत, नगर परिषद, बाजार समिती, पंचायत समिती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर सेनेचा झेंडा लावण्यासाठी शिवसैनिकांना प्रोत्साहन दिले.2ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या शासकीय दरबारी असलेल्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कार्यालयात विशेष व्यवस्था केली.3रु ग्णवाहिका, पाण्याचे टॅँकर, युवकांसाठी खेळ, सांस्कृतिक कार्यक्र मात सहभाग.भुजबळांच्या पराभवाचे कारण...निवडून गेल्यावर पाच वर्षे नॉट रिचेबल राहिले. आमदारांना भेटायचे तर त्यांचे स्वीय सहाय्यकांनाच भेटावे लागत असे. याचा रोष सामान्यांमध्ये व स्थानिक नेते मंडळीमध्ये होता. निवडणूक तोंडावर आली तरी त्यांनी जनसंपर्कठेवला नव्हता.पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते१ गोविंदा बोराळे बसपा 977२ पंकज भुजबळ राष्ट्रवादी 70,806३ राजेंद्र पगारे वंचित ब. आ. 13571४ विशाल वडघुले आम आदमी पार्टी 728५ अशोक पाटील अपक्ष 257६ सुदर्शन कदम अपक्ष 569७ भगवान सोनवणे अपक्ष 721८ पुंडलिक माळी अपक्ष 682९ मंगल अमराळे अपक्ष 409१० रत्नाकर पवार अपक्ष 12168११ राहुल काकळीज अपक्ष 407१२ शमीम सोनावाला अपक्ष 396१३ सुनील सोनवणे अपक्ष 631१४ संजय सानप अपक्ष 512

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nandgaon-acनांदगावShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस