पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची व वर्षानुवर्षे राजकारणाची डाव पेच आखण्याची परंपरा असलेल्या पिंपळगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सोमवार दि. २८ रोजी सुहास मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपसरपंचपदाच्या आवर्तन पद्धतीचा कार्यकाल संपल्याने उपसरपंचअश्विनी खोडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच अलका बनकर यांच्याकडे सुपुर्द केला त्यामुळे रिक्त झालेल्या जागेकरीता निवडणुक घेण्यात आली.लोकनियुक्त सरपंचपदाची प्रथमच झालेली निवडणूक अत्यंत चुरशीची होवून सरपंचपदाची माळ दिलीप बनकर गटाच्या अलका बनकर यांच्या गळ्यात पडली, तर उपसरपंचपद रोटेशन पद्धतीने असल्याने आतापर्यंत संजय मोरे, रुक्मिणी मोरे तर अश्विनी खोडे यांना एक-एक वर्षाकरिता पद देण्यात आले होते.मात्र आता खोडे यांनी रोटेशन पद्धतीने आपल्या उपसरपंच पदाचा राजनामा दिल्यानंतर सुहास मोरे यांची २०२१ च्या चौथ्या रोटेशन उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी सरपंच अलका बनकर, विश्वास मोरे, रवींद्र मोरे, सतीश मोरे, सदस्य संजय मोरे, गणेश बनकर, पं. स. सदस्य राजेश पाटील, सत्यभामा बनकर, अश्विनी खोडे, बापू कडाळे, अल्पेश पारख, सुरेश गायकवाड, छाया पाटील, नंदू गांगुर्डे, अंकुश वारडे, दीपक मोरे, हरिभाई पटेल, सुनील संगपाळ, दशरथ मोरे, बाळा बनकर, रामकृष्ण खोडे, राहुल बनकर, विकी मोरे, प्रशांत मोरे, गणेश मोरे, ग्राम विकास अधिकारी लिंगराज जंगम आदी उपस्थित होते.सरपंच व सदस्यांनी ठेवलेला विश्वास येणाऱ्या कार्यकाळात नक्कीच सार्थकी लावला जाईल व गावात गेल्या तीन वर्षांच्या विकासाची गाडी अजून जोरात धावती ठेवली जाईल.- सुहास मोरे, नवनियुक्त उपसरपंच, पिंपळगाव बसवंत.
पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुहास मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 4:15 PM
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची व वर्षानुवर्षे राजकारणाची डाव पेच आखण्याची परंपरा असलेल्या पिंपळगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सोमवार दि. २८ रोजी सुहास मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ठळक मुद्दे रिक्त झालेल्या जागेकरीता निवडणुक घेण्यात आली.