खेडगाव : येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाळासाहेब बाबुराब ठुबे यांनी विषारी कीटकनाशक घेऊन आपल्या द्राक्ष बागेत जीवन संपवले.दिड एकर क्षेत्र असलेल्या या शेतकऱ्याची एक बिघे द्राक्षाची काढणी झाली होती. आगामी हंगामात चांगले पीक येईल या आशेने त्यांनी नातेवाईकडून पैसे उसनवार घेतले होते. त्यातच वीज बिल थकबाकी थकल्याने त्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली. शिवाय द्राक्षांना अपेक्षित दर मिळाला नसल्याने उधारी कशी चुकती करायची या विवंनचनेत ते होते. त्यामुळे त्यांनी शनिवारी (दि.२०) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विषारी औषध पाशन केले. काही वेळेने त्यांच्या पत्नी घरी आल्या असता त्यांचा मोबाईल व डायरी घरात दिसली म्हणून त्यांनी शोधाशोध केली असता ठुबे शेतात बेशुद्ध अवस्थेत दिसले. त्यांना पिंपळगाव येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मावळली.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 7:36 PM
खेडगाव : येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाळासाहेब बाबुराब ठुबे यांनी विषारी कीटकनाशक घेऊन आपल्या द्राक्ष बागेत जीवन संपवले.
ठळक मुद्देउपचारादरम्यान मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मावळली.