ठळक मुद्देपोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली
येवला : तालुक्यातील आंबेगाव येथे आर्थिक अडचणीला वैतागून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.लासलगाव बाजार समितीत मजुरी काम करणाऱ्या लक्ष्मण निवृत्ती राजोळे (३३) याने बुधवारी (दि. २८) पहाटेच्या सुमारास आर्थिक अडचण व कर्जबाजारीपणाला कंटाळून घराच्या छताला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची देविदास राजोळे यांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.