साकोरा : सततची नापिकी, कमी पर्जन्यवृष्टी, उत्पन्नात घट, कमी भाव व कर्जबाजारी-पणाला कंटाळून नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील सुनील बाजीराव बोरसे (५१) यांनी भुसावळकडे जाणाºया रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.सततची नापिकी, कमी पर्जन्यवृष्टीमुळे उत्पन्नात झालेली घट, भाव नाही, अत्यल्प पाऊस व शेतीत केलेला खर्च वसूल होणार नसल्याने आणि दुबार पेरणीचे संकट तसेच बँकेचे अडीच लाख कर्ज व मुलीच्या लग्नाचे कर्ज अशाअनेक विवंचणेमुळे बोरसे यांनी नांदगाव रेल्वेस्थानक ते रेल्वे गेटदरम्यान रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.एक महिन्यांपूर्वीच साकोरा येथील मच्छिंद्र बोरसे या तरुण शेतकºयाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी धास्तावले आहेत. सुनील बोरसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई-वडील असा परिवार आहे. तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून, चिंता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 1:00 AM