ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. २१ : आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या देवळाली कॅम्पमधील बार्नस्कूल कर्मचाऱ्यांच्या संपाने गंभीर वळण घेतले आहे़. शाळेतील चिन्नाप्पा मंद्री (४५) या कुकमनने शाळेलगतच्या चौफुलीजवळ गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना बुधवारी (दि़२१) सकाळच्या सुमारास घडली़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक ज्युलियन कुक यांना ताब्यात घेतले आहे़ दरम्यान, उपोषण करण्यास सांगणाऱ्या संजय चव्हाण यास महिलांनी बार्नस्कुलमध्ये मारहाण केल्याची घटना घडली आहे़देवळाली कॅम्पमधील बार्न स्कुलमधील ९४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ व कायम करण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी शाळा प्रशासनाकडे अर्ज केले होते़ मात्र शाळा प्रशासनाने या सर्व कर्मचाऱ्यांना कमी करून महाराष्ट्राबाहेरील कर्मचाऱ्यांना कामावर घेतले व शाळा सुरू ठेवली़ यामुळे कमी केलेल्या कर्मचाऱ्यांनी शाळेच्या संचालकांविरोधात संप पुकाराला़ गत आठ महिन्यांपासून हे कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे़
या शाळेतील कुकमनचे काम करणारे चिन्नापा मुुंद्रा हे शाळेत कायमस्वरूपी कामगार होते़ संपात सहभाग घेतल्यामुळे शाळा संचालकांनी त्यांना कामावरून कमी केले होते़ या कालावधीत कुटुंबाची होणारी उपासमार व नैराश्य यामुळे चिन्नापा यांनी बुधवारी (दि़२१) शाळेलगतच्या चौफुलीजवळ गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ दरम्यान, कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने शाळा प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे