नाशिक : दोन दिवसांत दोन तरुण शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. या वर्षामध्ये आत्तापावेतो आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या २७ झाली आहे.जिल्ह्यात जानेवारीपासून शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत आहेत त्यात खंड पडलेला नाही. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील शिंदे येथील पुरुषोत्तम रघुनाथ आडचे (३५) या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर दिंडोरी तालुक्यातील चाडे येथील संदीप त्र्यंबक पेनमहाले (२६) या शेतकºयाने गुरुवारी रात्री विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी त्याचे प्रेत आढळून आले. या दोन्ही शेतकºयांच्या वडिलांच्या नावे शेतजमीन असून, ते सामायिक खातेदार आहेत. या आत्महत्येची कारणे स्पष्ट होऊ शकली नसली तरी, कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चालू महिन्यात जिल्ह्णात आजवर ४, तर जानेवारीपासून २७ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिनाअखेर २७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या.
दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:33 AM
नाशिक : दोन दिवसांत दोन तरुण शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. या वर्षामध्ये आत्तापावेतो आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या २७ झाली आहे.
ठळक मुद्दे शिंदे येथील पुरुषोत्तम रघुनाथ आडचेचाडे येथील संदीप त्र्यंबक पेनमहाले गेल्या वर्षी एप्रिल महिनाअखेर २७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या