नाशिक : महापालिकेकडून वर्षानुवर्षांपासून आरक्षित जागांच्या संपादनासंबंधी निर्णय घेतले जात नसल्याने शेतकरी अथवा जागामालकांमध्ये रोष वाढत चालला आहे. गेल्या २८ वर्षांपासून आरक्षित जागेचा मोबदला न मिळाल्याने पेठरोडवरील एका शेतकऱ्याने अखेर स्थायी समिती सभापतींना पत्र लिहून आत्महत्त्या करण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय, स्थायी समिती सभेत हजर राहण्याची व मत मांडण्याची परवानगीही सदर शेतकऱ्याने मागितली आहे.पेठरोड, पंचवटीतील सिद्धिविनायक नगरात राहणारे रमाकांत गोपीनाथ साळी यांनी स्थायी समिती सभापतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, सर्व्हे नंबर ३२/१ मखमलाबाद शिवारातील सदर जागेत डीपीरोड आणि शाळेसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे.
भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी आत्महत्त्येचा इशारा
By admin | Published: August 19, 2016 1:08 AM