शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: ...तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
5
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
7
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
9
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
10
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
11
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
12
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
13
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
14
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
15
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
16
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
17
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
18
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
19
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
20
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

मोक्कातील आरोपींचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:28 AM

न्यायालयातील सुनावणीनंतर मोक्कातील तिघा आरोपींना पोलीस ठाणे व मध्यवर्ती कारागृहात नेले जात असताना यातील दोघांनी पोलिसांसोबत हुज्जत घालून पोलीस वाहनावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि़ २५) सायंकाळच्या सुमारास घडली़

नाशिकरोड : न्यायालयातील सुनावणीनंतर मोक्कातील तिघा आरोपींना पोलीस ठाणे व मध्यवर्ती कारागृहात नेले जात असताना यातील दोघांनी पोलिसांसोबत हुज्जत घालून पोलीस वाहनावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि़ २५) सायंकाळच्या सुमारास घडली़ गुरु अर्जुन भालेराव (रा. येवला, जि. नाशिक), सागर गणेश मरसाळे (२७, रा. मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक) अशी या दोघा संशयितांची नावे आहेत़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी मोक्का गुरु भालेराव, सागर मरसाळे व विनोद गणेश मरसाळे (३२, रा. धुळे) या मोक्कातील आरोपींच्या सुनावणीची तारीख होती़ न्यायालयाने सायंकाळी या तिघांबाबत आदेश दिल्याने त्यांना कैदी पार्टीचे अधिकारी व कर्मचारी नाशिकरोड पोलीस ठाणे व नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात घेऊन जात होते़या तिघांना पोलीस वाहनात (एमएच १८, जी १७४) बसविले असता संशयितांनी धुळे पोलीस मुख्यालयातील सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सोनवणे व त्यांच्या साथीदार पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली़ संशयित गुरु भालेराव व सागर मरसाळे या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ तसेच हातापायी करून स्वत:चे डोके पोलीस वाहनावर आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी