नाशिक : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होऊन जून व जुलै महिन्यात तो विक्रमी बरसल्यानंतरही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने प्रशासन कोड्यात पडले असून, शेतकरी आत्महत्येमागची मुख्य कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकट्या जुलै महिन्यात बारा शेतकºयांनी जीवनयात्रा संपविण्याची बाब अधिक गांभीर्याने घेण्यात आली आहे.जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, चालू वर्षी जुलैअखेर ६७ शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळूनच शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे आजवरच्या चौकशीतून पुढे आले आहे. लहरी हवामान, मान्सूनच्या चुकलेल्या अंदाजामुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकºयाच्या पदरी दरवर्षी निराशाच पडू लागल्याने त्याच्यावर कर्जाचा डोंगर दरवर्षी मोठा होऊ लागल्याने परिस्थितीला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्येचा मार्ग जवळचा म्हणून पत्करला. गेल्या काही वर्षांत आकडेवारीत भरच पडत गेली असली तरी, गेल्या वर्षी जिल्ह्णात सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदविला तरीही जवळपास ८७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. चालू वर्षी आत्महत्येच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना तीदेखील फोल ठरली आहे. जानेवारी महिन्यापासून दरमहा साधारणत: सहा ते सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यंदा मान्सूनचे वेळेवर म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले व त्यानंतर मान्सूनही वेळेवर दाखल झाला. जून महिन्यात सरासरीच्या ११३ टक्के इतकी पावसाची नोंद होऊन शेतकºयांनी पेरण्याही पूर्ण केल्या तर जुलै महिन्यातही सुरुवातीचा आठवडा सोडला तर पावसाने आपली हजेरी कायम ठेवली. जुलै महिन्यात १४७ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असली तरी, संपूर्ण महिन्यात जिल्ह्णातील बारा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आकडा गेल्या सात महिन्यांतील सर्वाधिक असून, जिल्ह्णात पाऊस, पाणी मुबलक असतानाही शेतकºयांनी आत्महत्येचा टोकाचा मार्ग अवलंबिल्याने नेमके त्यामागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
जुलै महिन्यात बारा शेतकºयांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 1:12 AM