नाशिक : शहर व परिसरातील उपनगरांमध्ये शनिवारी (दि.१९) दोन विवाहितांसह एका युवकाने आत्महत्त्या करुन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्त्येमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सिडकोतील महाकाली चौक परिसरात राहणारा गौरव यशवंत बडगुजर (२७) याने राहत्या घरात रात्री आठ वाजेच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत मखमलाबाद येथील स्वामी विवेकानंद नगर परिसरात राहणा-या निर्मला निलेश शार्दुल (२६) या विवाहितेने सकाळच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना तातडीने रु ग्णालयात दाखल केले, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी म्हसरु ळ पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तीसºया घटनेत पंचवटीतील आडगाव नाका परिसरात राहणाºया ३२ वर्षीय अमनिदप बळवंतिसग संधु (३२) यांनी राहत्या घरात रात्री आठ वाजेच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. ही बाब पती बळवंतसींग यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दोन विवाहितांसह युवकाची आत्महत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 1:37 PM