शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नाशिक जिल्ह्यात कर्जबाजारी तरूण शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 3:27 PM

नाशिक : यंदाही कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून, येवला तालुक्यातील ममदापुर येथे तरूण शेतक-याने मध्यरात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चालू वर्षी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून चौदा शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.साईनाथ भागिनाथ शिंदे (२९) असे या शेतक-याचे नाव असून, रविवारी मध्यरात्री त्याने ...

ठळक मुद्देसत्र कायम : संख्या चौदाच्या घरात गेल्या वर्षी जिल्ह्यात १०५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या

नाशिक : यंदाही कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून, येवला तालुक्यातील ममदापुर येथे तरूण शेतक-याने मध्यरात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चालू वर्षी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून चौदा शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.साईनाथ भागिनाथ शिंदे (२९) असे या शेतक-याचे नाव असून, रविवारी मध्यरात्री त्याने राहत्या घरातच विषारी औषध सेवन केले. शिंदे याच्या नावावर ममदापुर येथे गट नंबर ८०७ मध्ये २.६३ हेक्टर शेतजमीन आहे. त्याच्या नावे कर्ज आहे काय याचा शोध घेतला जात आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणेच दरमहा सात ते आठ शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून गेल्या दोन महिन्यात तेरा शेतक-यांनी आत्महत्या केली तर मार्च महिन्यात पहिली आत्महत्या झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात १०५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. राज्यात शेतक-यांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण पाहता गेल्या वर्षी राज्य सरकारने शेतक-यांना कर्जमाफी योजना जाहीर करून दिड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले तरी देखील आत्महत्येचे प्रमाण कायम राहिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक