ताहाराबाद : ताहाराबाद येथील तरुण शेतकऱ्याने बुधवारी (दि.१०) शेतीवरील कर्जाला कंटाळून शेतातील कांदा चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली.सटाणा तालुक्यातील ताहाराबाद येथील बाळू धनाजी अहिरराव (४२) हे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव आहे. सन २०१५ मध्ये सटाणा येथील एच डी एफ सी शाखेकडून ८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. याखेरीज पतसंस्था व उसनवारी असे मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर कर्ज झाले होते.स्वत:च्या शेतात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर कष्ट करून शेतीमालाचे उत्पादन त्यांनी घेतले, मात्र शेतीमाल मातीमोल भावात विकला गेला. परिणामी त्यांना कर्जाची परतफेड करता न आल्याने कर्ज व त्यावरील व्याजाचा डोंगर वाढत गेला. यामुळे कर्जाच्या नैराश्याने अहिरराव यांनी आपल्या शेतातील कांदा चाळीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. नामपूर ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन झाले. रात्री उशिरा त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.
ताहाराबाद येथील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 8:08 PM
ताहाराबाद : ताहाराबाद येथील तरुण शेतकऱ्याने बुधवारी (दि.१०) शेतीवरील कर्जाला कंटाळून शेतातील कांदा चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
ठळक मुद्देमोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर कर्ज झाले होते.