सातपूर : संरक्षण साहित्य व सामग्रीच्या देशांतर्गत उत्पादन प्रक्रि येत नाशिकचे औद्योगिक क्षेत्र योग्य असल्याचे मत संरक्षण (उत्पादन) मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजय जाजू यांनी निमात आयोजित चर्चासत्रात व्यक्त केल्याने प्रस्तावित डिफेन्स इनोव्हेशन हबद्वारे नवनिर्मितीस उत्सुक असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे.नाशिकच्या प्रस्तावित डिफेन्स इनोव्हेशन हबसंदर्भात संरक्षण (उत्पादन) मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजय जाजू यांनी निमाला भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी जाजू यांनी सांगितले की, नाशिक औद्योगिक क्षेत्र उत्पादक हब म्हणून आधीच नावाजलेले आहे. नाशिकच्या उद्योगांची क्षमता पाहता डिफेन्स इनोव्हेशन हबद्वारे संरक्षण क्षेत्रातदेखील मोठे योगदान देतील. बऱ्याच वर्षांनंतर संरक्षण साहित्याच्या आयातीला पर्याय म्हणून देशांतर्गत उत्पादन प्रक्रि येस सुरु वात झाली आहे. त्यामुळे आगामी डिफेन्स इनोव्हेशनद्वारे नवनिर्मितीस उत्सुक असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कर्नल सुजित भोसले यांनी डिफेन्स पीएस यूज इस्टॅब्लिशमेन्ट अराउंड नाशिक या विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. यावेळी एचएएलचे उपमहाव्यवस्थापक गिरीश कर्वे, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सायबर तज्ज्ञ अमर ठाकरे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे नाशिकच्या क्षमतांची माहिती दिली.व्यासपीठावर निमाचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण, प्रदीप पेशकार, महिंद्र कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण आहेर, डिफेन्स इनोव्हेशन हबचे समन्वयक प्रशांत पाटील, संरक्षण खात्याचे उपसंचालक संजीव चड्डा, नौदलातील एव्हीएशन विंगचे कमांडर राजेश बाबू आदी उपस्थित होते. स्वागत प्रदीप पेशकार यांनी केले. आभार तुषार चव्हाण यांनी मानले. यावेळी सुधाकर देशमुख, कैलास आहेर, संदीप भदाणे, संजय सोनवणे, देवेंद्र बापट, मनीष कोठारी, मंगेश पाटणकर, अखिल राठी, मनीष रावळ, उदय रकिबे, एम. जी. कुलकर्णी, हिमांशू कनानी, गौरव धारकर, राजेंद्र जाधव, समीर पटवा, जयंत खेडकर, राजेश गडाख आदींसह उद्योजक व अधिकारी उपस्थित होते.नवीन उद्योगांना प्रोत्साहन मिळेलइनोव्हेशन म्हणजेच नवनिर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक उद्योगाने इंनोव्हेशन ग्रुप तयार करून आउट आॅफ द बॉक्स विचार प्रणाली अंमलात आणावी. अशक्यप्राय वाटणाºया गोष्टी उद्योजक इनोव्हेशनद्वारे प्रत्यक्षात उतरवतील व डिफेन्स इनोव्हेशनद्वारे नवनिर्मितीस उत्सुक असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन मिळेल. एचएएल व भारत इलेक्ट्रॉनिक्स यांची इनोव्हेशन हबमध्ये भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यातून देशांतर्गत उत्पादन प्रक्रि येची भावी दिशा ठरणार असल्याचेही संजय जाजू यांनी सांगितले.
संरक्षण सामग्रीच्या उत्पादन प्रक्रि येत नाशिक क्षेत्र योग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:08 AM
संरक्षण साहित्य व सामग्रीच्या देशांतर्गत उत्पादन प्रक्रि येत नाशिकचे औद्योगिक क्षेत्र योग्य असल्याचे मत संरक्षण (उत्पादन) मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजय जाजू यांनी निमात आयोजित चर्चासत्रात व्यक्त केल्याने प्रस्तावित डिफेन्स इनोव्हेशन हबद्वारे नवनिर्मितीस उत्सुक असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे.
ठळक मुद्देसंजय जाजू : डिफेन्स इनोव्हेशन हबवर संवाद