तिघे ताब्यात : वडिलोपार्जित पैशांवरून वाद लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : आईच्या वडिलोपार्जित जमिनीत हिस्सा व पैसे मागतो या कारणावरून मामानेच भाच्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी संशयिताना अटक करण्यात आली आहे. अमोल पवार (२७) असे मृत तरुणाचे नाव आहे. अमोल रमेश पवार (२७) व त्याची आई शालिनी रमेश पवार हे दोघेही १३ जून रोजी भेंडाळी-औरंगपूर येथे मामाकडे आले होते. अमोल मामा गणेश सत्यभान आढाव यांच्याकडून दहा हजार रुपये घेऊन सिन्नरला एकटाच निघून गेला. तो घरी परत आला नसल्याची तक्र ार तरुणाची आई शालिनी रमेश पवार (हल्ली मुक्काम सिन्नर) हिने सायखेडा पोलीस स्टेशनला दाखल केली होती. तक्र ार दाखल होताच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत संशयितांवर कलम ३०२, २०१, १२० ब, ३२३, ५०४, ३४ लावण्यात आले आहेत. संशयित गणेश आढाव, शालिनी पवार, यादव चाबुकस्वार यांना ताब्यात घेतले. १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली असून, तपास चालू असल्याचे पोलीस निरीक्षक ए.एस. मोरे यांनी सांगितले.संशयित आरोपी गणेश आढाव याने गुह्याची कबुली दिली असून, मृतदेह अजून पोलिसांना मिळून न आल्याने पोलिसांची कसोटी लागली आहे. संशयित आरोपी दिशाभूल करणारी माहिती देत असल्यामुळे पोलिसांचा ताप वाढला आहे. अधिक तपास सायखेडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक ए.एस. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सायखेडा येथे मामाकडून भाच्याचा खून
By admin | Published: July 14, 2017 12:38 AM