नाशिक : राज्यात थंड म्हणून काही दिवसांपुर्वी नोंद झालेल्या नाशिकचे हवामान तितक्याच गतीने बदलत असून त्याचा मानवी आरोग्यावरही परिणाम जाणवत आहे. शहराच्या कमाल तपमानात वाढ होऊ लागल्याने फेब्रुवारीअखेर शहर तापण्यास सुरूवात झाल्याचा अनुभव नाशिककरांना सध्या येत आहे.शहराच्या कमाल-किमान तपमानात होणारी वाढ, वा-याचा मंदावलेला वेग वातावरणात उष्मा वाढविणारा ठरत आहे. मागील आठवडाभरापासून कमाल तपमानाचा पारा ३० अंशापुढे स्थिरावत असल्यामुळे ‘कुल नाशिक’ आता ‘हॉट’ होऊ लागले आहे. किमान तपमानाचा पारा जानेवारीमध्ये आठ अंशापर्यंत घसरला होता व कमाल तपमान २६ अंशापर्यंत घसरले होते; मात्र वातावरण बदलामुळे कमाल-किमान तपमानातही वेगाने बदल होत असून तपमान वाढण्यास सुरूवात झाली आहे. किमान तपमान १६अंशापर्यंत वर सरकरले असून कमाल तपमान ३४.८ अंशापर्यंत नोंदविले गेले आहे. फेब्रुवारीमध्ये किमान तपमानाचा १६.५ इतका उच्चांक तर कमाल तपमान उच्चांकी ३५.८ इतके नोंदविले गेले. शहराचे कमाल तपमान फेब्रुवारी महिन्यात पस्तीशीच्या जवळ पोहचल्याने मार्च महिन्यात वा-याचा वेग मंदावलेला राहिल्यास तपमान अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी २७ फेब्रुवारी रोजी उच्चांकी ३६.१ अंश इतक्या तपमानाची नोंद झाली होती. त्या तुलनेत तपमान काही अंशी कमी राहिले; मात्र उन्हाचा चटका जाणवत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वा-याचा वेग जास्तच मंदावल्याने ऊन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
उन्हाचा चटका : ‘कुल नाशिक’ होतयं ‘हॉट’; ३५.८ कमाल तपमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 3:36 PM
राज्यात थंड म्हणून काही दिवसांपुर्वी नोंद झालेल्या नाशिकचे हवामान तितक्याच गतीने बदलत असून त्याचा मानवी आरोग्यावरही परिणाम जाणवत आहे.
ठळक मुद्देकमाल तपमानाचा पारा ३० अंशापुढे स्थिरावत असल्यामुळे ‘कुल नाशिक’ आता ‘हॉट’ कमाल तपमान ३५.८ अंशापर्यंत नोंदविले गेले