लासलगांव : कांद्याचे भाव वाढले की शहरी भागातील लोक मेटाकुटीला येतात आणि भाव कमी झाले की ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे डोळे पाणावतात. हे विषम चित्र बदलण्याचे नाव घेत नाही. आशिया खंडातील प्रथम क्र माकांची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये शुक्रवारी (दि.३०) कांद्याला ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दररोज उन्हाळी आणि लाल कांद्याच्या दरात घसरण सुरु च असून शेतकरी बांधव आर्थिक विवंचनेत सापडला आहे.उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यानेही शेतक-यांना साथ दिलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी लिलावाप्रसंगी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदा ३ तर लाल कांदा अवघा ११ रु पये किलो दराने विक्री झाला आहे. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी कमालीचा हतबल झाला आहे. राज्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे लाल कांद्याचे उत्पघादन कमी होणार असल्याचे गृहित धरत उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतक-यांनी उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात चाळीत साठवून ठेवला होता. उन्हाळ कांदा हा आॅक्टोंबर महिन्यात संपुष्टात येतो, मात्र उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत येत आहे. हा कांदा सात ते आठ महिने जुना साठवलेला असल्याने या कांद्याच्या मागणीत घट होत आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याला किलोला एक ते तीन रु पये बाजार भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.बळीराजा हतबलशेतक-यांना कांदा लागवडीपासून ते खुरपणी, औषध फवारणी, रासायनिक खते देणे, पाणी देणे, त्यातच दिवसा लोडशेडिंग असेल तर रात्रीच्या वेळी पाणी देणे आणि विक्र ीसाठी कांदा बाजारात आणणे, यासाठी हजारो रु पये खर्च येतो. मात्र, तेवढाही खर्च सध्याच्या कांद्याच्या बाजारभावामुळे निघत नसल्याने आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण कशा भागवाव्यात असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. शासनाने कांद्याला हमीभाव द्यावा,अशी मागणी जोर धरु लागली आहे.
उन्हाळी कांद्याला प्रतिकिलो तीन रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 5:44 PM
लासलगाव मार्केट : घटत्या दरामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त
ठळक मुद्दे लाल कांद्याचे उत्पघादन कमी होणार असल्याचे गृहित धरत उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतक-यांनी उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात चाळीत साठवून ठेवला होता