येवला : शेतकऱ्यांनी चाळीत साठविलेला कांदा संपत आल्याने आणि लाल कांदा येण्यास उशीर असल्याने सप्ताहात येवला व अंदरसूल कांदा बाजार आवारात उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव तेजीत असल्याचे दिसुन आले.कांद्यास देशांतर्गत तसेच परदेशात चांगली मागणी होती. सप्ताहात एकुण कांदा आवक ११ हजार २०६ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान १००० ते ५९८७ रुपये तर सरासरी ५ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक १९४३ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान १००० ते ५५२५ रुपये तर सरासरी ४७०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. सप्ताहात गव्हाची एकूण आवक १३ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १९०० रुपये ते कमाल २३५१ रुपये तर सरासरी २ हजार रुपयांपर्यंत होते. बाजरीची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. बाजरीची एकुण आवक २८१ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १५०० ते कमाल २२५१ रुपये तर सरासरी १६०० रुपयांपर्यंत होते.सप्ताहात मूगाची एकुण आवक ६६ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ४००० ते कमाल ७ हजार रुपये तर सरासरी ६१०० रुपयांपर्यंत होते. तर सोयबीनची एकुण आवक ३२७ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३ हजार ते कमाल ३८९९ रुपये तर सरासरी ३६८८ रुपयांपर्यंत होते. सप्ताहात मकाच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. मक्यास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात मक्याची एकुण आवक २४१२६ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १ हजार ते कमाल१७९१ रुपये तर सरासरी १४५० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.
उन्हाळ कांद्याची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 5:39 PM
येवला बाजार : लाल कांदा येण्यास उशीर
ठळक मुद्देसप्ताहात एकुण कांदा आवक ११ हजार २०६ क्विंटल झाली