खामखेडा : खामखेडा परिसरात सर्वत्र उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम चालू असल्याने सर्वत्र मंजूर टंचाई जाणवत आसल्याने परगावाच्या मंजुराचा कडून कामे केली जात आहे.गेल्या आठ-दहा वर्षापासून कांदा या पिकाकडे हमखस पैसा देणारे पिक म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी कांदा लागवड करतो. गेल्या चार-पाच वर्षापूवी कोकणातील आदिवासी त्याच्याकडे कामे नसल्याने कामाच्या शोधार्थ ते उन्हाळी कांदा काढणीच्या वेळेस दरवर्षी येतात. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून हे कोकणी मजूर आता मार्केट मघील व्यापाऱ्याच्या खळयावर सावलीत कांदाच्या गोणी भरण्यासाठी जात असल्याने खामखेडा भऊर, सावकी, पिळकोस आदि परिसरात मोठ्या प्रमाणात मजुर टंचाई जाणवू लागली आहे.सध्या सर्वत्र कांदा काढणीचा हंगाम चालू असल्याने स्थानिक गावातील मजुर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना परगावाहून मजूर आणावे लागत आहे. गावातील मजुरी करणारे आता तेही बागायती शेती करु लागल्याने मजुरांची सर्वत्र कमतरता भासू लागली आहे.गेल्या वर्षी या काही भागामध्ये अल्पशा पावसामुळे विहीरींना पाणी नसल्याने त्या भागात शेतीची कामे नाहीत. दरम्यान आता स्थानिक मजुरांपेक्षा बाहेरगावाचे मजूर मोठ्या प्रमाणात येताना दिसून येत आहे.
खामखेडा परिसरात उन्हाळी कांदा काढणीस सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 6:49 PM
खामखेडा : खामखेडा परिसरात सर्वत्र उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम चालू असल्याने सर्वत्र मंजूर टंचाई जाणवत आसल्याने परगावाच्या मंजुराचा कडून कामे केली जात आहे.
ठळक मुद्देपरिसरात मोठ्या प्रमाणात मजुर टंचाई जाणवू लागली आहे.