पाटणे : परिसरात यावर्षी अतिवृष्टीने उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाली होती. शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करून मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड केली होती. परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे विक्रमी लागवड होऊनही करपा रोगामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही.
सध्या सगळीकडे उन्हाळ कांदा काढणी अंतिम टप्प्यात असून, मार्च महिन्याच्या अखेरीपासून कांदा काढणी सुरू आहे. एकाच वेळी काम सुरू असल्याने मजुरांची टंचाई भेडसावत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कांदा काढणे मजुरी एकरी सात ते आठ हजार रुपये असून, काही मजूर २५ ते ३० रुपये वाफा याप्रमाणे कांदा काढण्यासाठी मजुरी घेत आहेत. ठेका पद्धतीनेही संपूर्ण काम केले जात आहे.
उन्हाळ कांदा साठवण्यायोग्य असल्याने बरेच शेतकरी चाळीत साठवण करत आहेत. कारण यंदा कांदा पिकाचा उत्पादन खर्च दुपटीने वाढला आहे. आजच्या दराने कांदा विकला असता अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे त्यातून उत्पादन खर्चही निघणार नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी भविष्यात कांद्याच्या दरात वाढ होईल, या अपेक्षेने शेतकरी उन्हाळ कांदा साठवणुकीवर भर देताना दिसून येत आहे. परिसरात कांदे काढणी व कांदे साठवणुकीची लगबग दिसून येत आहे.
-------------
मालेगाव तालुक्यात पाटणे परिसरात कांदा काढणीच्या कामात शेतकरी कुटुंब व्यस्त आहे. (२१ मालेगाव २)
===Photopath===
210421\21nsk_6_21042021_13.jpg
===Caption===
२१ मालेगाव २