शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

उन्हाळ कांद्याचा आता बसेना मेळ, भाव वाढताच निर्यातबंदीचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 5:28 PM

जळगाव नेऊर : कोरोना संकटकाळात उन्हाळं कांद्याला लागलेली साडेसाती शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही, सहा महिन्यापासून भाववाढीच्या आशेने चाळीत साठवलेला कांदा सडलेला असताना उरलेला कांद्याला भाव वाढून चार पैसे पदरात पडतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचे मात्र केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी करु न तोंडचे पाणी पळविले आहे.

ठळक मुद्देसाठवणुकीवर परिणाम : तीन महिन्यापुर्वीच कांदा जीवनाश्यक वस्तुतून वगळला होता

जळगाव नेऊर : कोरोना संकटकाळात उन्हाळं कांद्याला लागलेली साडेसाती शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही, सहा महिन्यापासून भाववाढीच्या आशेने चाळीत साठवलेला कांदा सडलेला असताना उरलेला कांद्याला भाव वाढून चार पैसे पदरात पडतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचे मात्र केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी करु न तोंडचे पाणी पळविले आहे. सन २०१९-२० वर्षात इतर राज्यात झालेल्या पावसाने त्या राज्यातील कांदा सडल्याने महाराष्ट्रातील बळीराजाच्या लाल कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला, आणि चार पैसे पदरात पडले पण अतिवृष्टीने उन्हाळ कांद्याची रोपे सडुन गेली होती, म्हणून सोन्याच्या भावात रोपे खरेदी करून उन्हाळ कांदा लागवड केल्या, पण मागील वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे दव आणि धुके, तर कधी पाऊस तर कधी उष्ण दमट वातावरण राहिल्याने त्याचा परिणाम उन्हाळ कांद्यावर झाला. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात औषधे फवारणी करु न कांदा वाचवला.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा सडण्याचे प्रमाण अधिक आहे ,तसेच अनेक शेतकर्यांनी कोरोना संसर्ग साथीमुळे भाव वाढतात कि नाही यामुळे आहे त्या भावात कांदा विकला. जून महिन्यात केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल करु न त्यामधून कांदा वगळण्यात आला होता. त्यानंतर देशांतर्गत व विदेशात कांद्याला चांगला दर मिळत असल्याने बळीराजाच्या चेहºयावर समाधानी भाव उमटताना दिसत होते. खिशात चांगले पैसे जमा होत असल्याच्या या त्यांच्या आनंदावर निर्यातबंदी निर्णयाने विरजण पडले आहे.शेतकºयांचा कांदा पन्नास साठ टक्के चाळीतच सडल्याने उकिरड्यावर फेकावा लागला, उरलेल्या कांद्यातुन चार पैसे पदरात पडतील अशी अशा होती, मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करु न तोंडचे पाणी पळविले आहे. त्यामुळे यापुढे शेतकरºयांनी कांदा साठवणूक करावी कि नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.- केदारनाथ कुराडे,जळगाव नेऊर. 

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा