नाशिक : शहरात उन्हाचा तडाखा कायम असून, उष्ण वातावरणामुळे नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. गुरुवारी (दि.१३) शहरात हंगामातील उच्चांकी ४०.९ इतक्या तपमानाची नोंद करण्यात आली. मागील पाच वर्षांमध्ये प्रथमच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पारा चाळिशीपार गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे.मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तीन दिवस सुमारे ४०.३ अंशांवर शहराचे तपमान होते. त्यानंतर प्रथमच बुधवारी ४०.७ अंशांवर पारा सरकला आणि गुरुवारी दोन अंशांनी वाढ होऊन पारा ४१ अंशांच्या आसपास पोहचला आहे. एकूणच दररोज वाढणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नाशिक उष्ण बनले आहे.वाढत्या उन्हाची तीव्रता पुढील दोन दिवस कायम राहिल्यास पुन्हा उष्णतेची लाट आल्याची घोषणा सरकारी पातळीवरून होण्याची शक्यता आहे. यावर्षी प्रथमच ४०.९ इतक्या कमाल तपमानाची नोंद झाली आहे.
उन्हाचा तडाखा; पारा ४०.९
By admin | Published: April 14, 2017 1:15 AM