नाशिक : नाशिकच्या ‘देवराई’द्वारे हरित भविष्य साकारण्यासाठी ५ जून २०१५ रोजी हजारो आबालवृद्ध नाशिककर सातपूर येथील वनविभागाच्या जागेवर (फाशीचा डोंगर) आपलं पर्यावरण संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकत्र आले होते. वनमहोत्सवातून त्यावेळी तब्बल ११ हजार रोपांची लागवड झाली. तीन वर्षांत रोपांचीही चांगली वाढ झाली असून, किमान पुढील दोन वर्षे तरी नाशिककरांना रोपांच्या संवर्धनाची काळजी घ्यावीच लागणार आहे. मार्चचा अखेरचा आठवडा सुरू असून, सूर्य तळपू लागल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. देवराईला तरुण हातांची प्रतीक्षा कायम असून, दर रविवारी तरुणाईने देवराईकडे पाऊल वळवून हरित नाशिकसाठी हातभार लावण्याचा प्रयत्न क रणे आवश्यक आहे.वनविभाग व आपलं पर्यावरण संस्थेने संयुक्तरीत्या ३४ महिन्यांपूर्वी वनमहोत्सव राबविला. या वनमहोत्सवाला नाशिककरांचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसादामुळे दहा हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होऊन एक हजार अतिरिक्त रोपे लावण्यात आली. नाशिककरांनी एकाच दिवशी ११ हजार रोपांची लागवड यशस्वीपणे करून दाखविल्याने हा ‘नाशिक पॅटर्न’शासनाचा लक्षवेधी ठरला. ‘देवराई’निर्मितीचा पॅटर्न राज्यभर राबविण्याचे धोरण वन मंत्रालयाने घेत ५० कोटी झाडे लागवडीचा संकल्प सोडला.आपलं पर्यावरण संस्थेकडून तीन वर्षांपासून येथील रोपट्यांचे संगोपन-संवर्धन करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे; मात्र काही स्वयंसेवक उच्च शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराबाहेर स्थायिक झाल्याने मनुष्यबळ तोकडे पडू लागले आहे. वनविभाग, वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरण विभागाकडूनही आठवड्यातून एक दिवस तरी या ठिकाणी वनमजुरांना पाचारण करण्याची मागणी होत आहे.
उन्हाचा तडाखा : नाशिकच्या ‘देवराई‘वरील रोपट्यांना हवी तरुण हातांची ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 4:26 PM
आपलं पर्यावरण संस्थेकडून तीन वर्षांपासून येथील रोपट्यांचे संगोपन-संवर्धन करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे; मात्र काही स्वयंसेवक उच्च शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराबाहेर स्थायिक झाल्याने मनुष्यबळ तोकडे पडू लागले आहे.
ठळक मुद्दे संस्थेकडून तीन वर्षांपासून येथील रोपट्यांचे संगोपन-संवर्धन बोटावर मोजण्याइतक्या स्वयंसेवकांची धडपडवनविभाग व आपलं पर्यावरण संस्थेने संयुक्तरीत्या ३४ महिन्यांपूर्वी वनमहोत्सव राबविला