विंचूर : महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेची बैठक राज्य नेते विठ्ठलराव धनाईत यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. ११) दुपारी १२ वाजता श्री लॉन्स, दाभाडी (ता. मालेगाव) येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस सोपान गंभीरे यांनी दिली. शासन अधिसूचना अन्वये अभावित केंद्रप्रमुखांना पदावनत करून पदवीधर प्राथमिक शिक्षक या मूळ पदावर पदावनत करण्याचा शासन निर्णय झाला आहे. यासंदर्भात संघटनेची भूमिका व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सर्व केंद्रप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच दुपारी १ वाजता जिल्हा व सर्व तालुका कार्यकारिणी सदस्यांसाठी बैठक होणार असून, त्यात बी.एड. परवानगी व रजावेतनाबाबत संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे पाठविलेल्या २६ प्रस्तावांतील शिक्षकांच्या बाबतीत संघटनेची आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
शिक्षक संघटनेची रविवारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:10 AM