नागपूर कार्यालयातील राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकाेडकर हे प्रदीर्घ सेवेनंतर भारतीय वनसेवेतून सेवानिवृत्त झाले. १९८६ सालच्या बॅचचे भारतीय वनसेवेतील काकोडकर हे अधिकारी आहेत. डिसेंबर २०१८ सालापासून ते पीसीसीएफ या पदावर कार्यरत होते. त्यांनी वन्यजीव व्यवस्थापन प्रशिक्षणामध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. काकोडकर यांनी ताडोबा, मेळघाट, ठाणे आदी ठिकाणी वन्यजीव विभागात भरीव कामगिरी केली आहे. उत्तम जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांच्या कार्यकाळात प्रथमच गेल्या फेब्रुवारी महिन्यात शहापूर येथे वनरक्षक प्रशिक्षण संस्थेत राज्यस्तरीय वनरक्षक, वनपाल यांच्याकरिता कार्यशाळा पार पडली होती. वन्यजीव व्यवस्थापनेसह फ्रंटलाइनवरील कर्मचारी, अधिकारीवर्गाची क्षमता उंचावण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. मानव-वन्यजीव संघर्ष थोपविण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम चालविले.
--इन्फो--
लिमये १९८८ च्या बॅचचे आयएफएस अधिकारी
सुनील लिमये हेदेखील १९८८ सालच्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. त्यांनी ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत पुणे, कोल्हापूर, सातारा, रायगड, अमरावती, नागपूर, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे विविध उच्च पदांवर जबाबदारी पार पाडली आहे. लिमये यांची राज्य शासनाने राज्याच्या वन्यजीव विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी पदोन्नती दिली आहे.
010721\01nsk_36_01072021_13.jpg~010721\01nsk_37_01072021_13.jpg
सुनील लिमये यांची नियुक्ती~सुनील लिमये यांची नियुक्ती