ग्रामपंचायत निवडणुकीत गायकवाड यांच्या पॅनलने ११ पैकी ८ जागा मिळविल्या होत्या. प्रतिस्पर्धी पॅनलला तीन जागा मिळाल्या होत्या. सदस्यांच्या विशेष सभेत सरपंचपदी अॅड. गायकवाड यांच्या पत्नी सुनीता गायकवाड तर उपसरपंचपदी चुलत बंधू भिमाजी गायकवाड विजयी झाले. सभेस ग्रामपंचायत सदस्य बापू गायकवाड, विनोद कोळगे, अनिता भाऊराव गायकवाड, अनिता बाळू गायकवाड, प्रवीण एकनाथ बर्डे, ललिता नानासाहेब लेकुरवाळे, निलेश दिलीप चव्हाण, मंगला संजय तळेकर, शोभा भाऊसाहेब तळेकर उपस्थित होते.
दरम्यान, नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी योगेश गोरे, जयेश लेकुरवाळे, दिलीप चव्हाण, पुंजाराम गोरे, भाऊसाहेब गोरे, अशोक लेकुरवाळे, शिवाजी गायकवाड, रावसाहेब गायकवाड, बाळासाहेब बोंबले, दीपक बोंबले, कौतिक तळेकर, भाऊराव गायकवाड, रामराव गायकवाड, सोमनाथ गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, मनोहर पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होत.
फोटो- १७ अनकुटे सरपंच
अनकुटे सरपंचपदी निवड झाल्यानंतर सुनीता गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सदस्य.
===Photopath===
170221\17nsk_52_17022021_13.jpg
===Caption===
फोटो- १७ अनकुटे सरपंच अनकुटे सरपंचपदी निवड झाल्यानंतर सुनीता गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सदस्य.